Home Vernacular Blogs Marathi Heart Transplant

      Heart Transplant

      Cardiology Image 1 Verified By Apollo Cardiologist October 21, 2023

      3102
      Heart Transplant

      ह्रदय प्रत्यारोपण – एक प्रवास

      ह्रदय प्रत्यारोपण आता वैज्ञानिक कल्पक कथांचा भाग राहिलेले नाही. वर्तमान वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे एक स्पष्ट वास्तव आहे. ह्रदय प्रत्यारोपणामध्ये आजारी ह्रदय बदलून त्याजागी दाताचे निरोगी ह्रदय प्रत्यारोपित केले जाते, विशेषतः ह्रदय बंद पडण्याच्या स्थितीमध्ये. इकोकार्डिओग्राम द्वारा ह्रदय बंद पडल्याचे निदान केले जाऊ शकते. यामध्ये इजेक्शन फ्रॅक्शन (EF) मोजले जाते आणि बंद पडणाऱ्या ह्रदयाला प्रतिसाद म्हणून रक्तातील NT-प्रो BNP संप्रेरक वाढते. तीव्र ह्रदय बंद पडण्याच्या घटनेमध्ये, रुग्णाला ह्रदय प्रत्यारोपणाची गरज भासू शकते.

      घन अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्राप्तकर्त्यांसाठी राखल्या जाणाऱ्या शासकीय प्रतिक्षा यादीत रुग्णाला समाविष्ट केले जाते आणि प्रतिक्षा यादीतील प्राधान्यानुसार अवयव देऊ केला जातो. प्रत्यारोपणापूर्वी व नंतर संघाद्वारे केल्या जाणाऱ्या अनेक हालचालींमधून प्रत्यारोपणाची निष्पत्ती ठरवली जाते आणि ती केवळ शस्त्रक्रियेवरूनच ठरवली जात नाही.

      ह्रदयाचे प्रत्यारोपण ही जरी मोठी शस्त्रक्रिया असली तरी, योग्यप्रकारे पाठपुरावा निगा राखल्यास, जिवंत राहण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या आप्तांना ह्रदयाचे प्रत्यारोपण करण्याच्या निर्णयाचा सामना करावा लागतो तेव्हा, संभाव्य जोखमी, पाठपुरावा निगा आणि शस्त्रक्रिया यांसह संपूर्ण प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेतून काय अपेक्षा करावी हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.

      प्रत्यारोपणासाठी ह्रदय दान देण्याची काय प्रक्रिया आहे?

      ह्रदयाच्या प्रत्यारोपणासाठी एका अशा व्यक्तीकडून ह्रदयाचे दान आवश्यक असते ज्याचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले गेले आहे आणि जो व्हेंटिलेटरवर आहे. मृत दातांपेक्षा प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे, बहुतांश रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. प्रत्यारोपणाच्या रुग्णांना सहसा प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट केले जाते. इतर अनेक प्रतीक्षा यादींप्रमाणे विरुद्ध राष्ट्रीय प्रत्यारोपण प्रतीक्षा सूची प्रथम येण्यास, प्रथम प्राधान्य या तत्वावर कार्य करत नाही. जेव्हा दात्याचे ह्रदय उपलब्ध असते तेव्हा, तीन घटकांनुसार प्रत्यारोपणाच्या रुग्णाशी त्याची जुळणी करून पाहिली जाते –

      • बालरोग स्थिती,
      • तातडीची वैद्यकीय गरज,
      • दात्याच्या रुग्णालयापासूनचे अंतर

      सर्व अवयवांच्या जुळणी प्रक्रियेतील इतर महत्त्वपूर्ण घटकांमध्ये शरीराचे आकारमान, रक्ताचा प्रकार आणि इतर प्रसंगोचित वैद्यकीय माहिती यांचा समावेश होतो.

      दाता मूल्यमापन आणि प्राप्तकर्त्याची तयारी कशी केली जाते?

      इको-कार्डिओग्राफिक, हिमोडायनामिक, संप्रेरके, ब्रॉन्कोस्कोपिक आणि संसर्गजन्य आजारांचे मापदंड यांच्या एका मालिकेद्वारे मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे मूल्यांकन करून त्याचा अवयव प्राप्तकर्त्यामध्ये प्रत्यारोपित करण्याचा दर्जा आणि सुरक्षेचे मूल्यांकन केले जाते. अवयवाचा दर्जा आणि प्रत्यारोपणाची निष्पत्ती सुधारण्यासाठी दात्याचे पुनरुत्थानही केले जाते. यामध्ये मेंदू मृत झालेल्या व्यक्तीला काही प्रगत उपचारात्मक प्रोटोकॉल प्रशासित केले जातात. प्राप्तकर्त्याचेही बारकाईने मूल्यांकन केले जाते आणि आसन्न प्रत्यारोपणाच्या सज्जतेमध्ये ठेवला जातो. गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णांमध्ये, नवीन अवयव उपलब्ध होईपर्यंत, ECMO आणि VAD यांसारखी यांत्रिक अभिसरण सहयोग उपकरणे वापरली जातात.

      ह्रदयाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये काय होते?

      एकदा का दाता ह्रदय उपलब्ध झाले की ह्रदय काढले जाते, थंड केले जाते आणि एका विशेष द्रावणात साठवले जाते आणि शक्य तितक्या लवकर प्रत्यारोपण पार पाडले जाते. शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाला ह्रदय-फुफ्फुस यंत्रावर ठेवले जाते, ज्यामुळे ह्रदयावर शस्त्रक्रिया केली जात असतानाही शरीराला रक्तातून महत्त्वाचा प्राणवायू आणि पोषक तत्वे मिळत राहतात. ह्रदयाच्या वरच्या कप्प्यांतील कर्णिकेच्या मागील भिंती वगळता रुग्णाचे ह्रदय काढले जाते. दात्याच्या ह्रदयाची मागील बाजू डाव्या वरच्या झडपेपाशी उघडली जाते आणि ती प्राप्तकर्त्याच्या संबंधित अवशिष्ट भागाला जोडली जाते. उजव्या बाजूच्या (व्हिने कॅव्ह) २ मोठ्या शिरा स्वतंत्रपणे जोडल्या जातात. नंतर रक्तवाहिन्या जोडून ह्रदय आणि फुफ्फुसांतून रक्ताचा प्रवाह सोडला जातो.
      ह्रदय प्रत्यारोपणाच्या संघामध्ये पुढील तज्ज्ञांचा समावेश होतो –
      कार्डिओलॉजी (हृदयचिकित्सा)
      कार्डिअॅक सर्जरी (ह्रदयाची शस्त्रक्रिया)
      संसर्गजन्य आजार
      नेफ्रॉलॉजी (वृक्कविकार शास्त्र)
      पल्मनॉलॉजी (फुफ्फुसशास्त्र)
      गंभीर निगा
      एन्डोक्रिनॉलॉजी (अंतःस्त्रावशास्त्र)
      कार्डियाक अॅनेस्थेसियोलॉजी (ह्रदयासाठी भूल देण्याचे शास्त्र)

      शस्त्रक्रियेला किती वेळ लागतो?

      ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे जी दात्याचे ह्रदय मिळवल्यानंतर साधारण ४ ते ८ तास चालते. शस्त्रक्रियेनंतर, बहुतांश प्राप्तकर्ता काही दिवसांतच हिंडू फिरू लागतात आणि १० ते १५ दिवसांमध्ये त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाते.

      ह्रदयाच्या प्रत्यारोपणानंतरचे प्रोटोकॉल काय आहेत?

      अत्याधुनिक प्रत्यारोपण केंद्रामध्ये एक निरिक्षण प्रणाली असते जी संक्रमणे, संप्रेरकांच्या असंतुलनामुळे मधुमेह आणि ऑस्टिओपोरोसिस होणे यांसारख्या गुंतागुंती टाळण्यासाठी बारकाईने पाठपुरावा करत असते. एंडोमायोकार्डियल बायॉप्सी द्वारा तीव्र नकाराचे मूल्यांकन केले जाते आणि अभिनव ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी द्वारा जुनाट नकाराचे मूल्यांकन केले जाते. जगभरामध्ये केवळ मोजक्याच केंद्रांमध्ये ही तपासणी उपलब्ध आहे.

      निष्कर्ष

      ह्रदयाचे प्रत्यारोपण ही केवळ एक शस्त्रक्रिया नसते तर एक दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. ह्रदय बंद पडण्याच्या व्यवस्थापनापासून याची सुरुवात होते, नंतर सर्वोत्तम निकाल मिळण्यासाठी प्रत्यारोपणापूर्वीच्या उपाययोजना करून शेवटी प्रत्यारोपणानंतरच्या प्रेमळ आणि जागरूक देखरेखीपर्यंत पोहोचते.

      
        
      https://www.askapollo.com/physical-appointment/cardiologist

      The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content

      Cardiology Image 1

      Related Articles

      More Articles

      Most Popular Articles

      More Articles
      © Copyright 2024. Apollo Hospitals Group. All Rights Reserved.
      Book ProHealth Book Appointment
      Request A Call Back X