Verified By Apollo Cardiologist October 21, 2023
2166ह्रदयविकाराचा झटका, ज्याला मायोकार्डिअल इनफार्कशन किंवा “MI” असेही म्हणतात, तो येऊन गेल्यावर तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी उपचार योजना तयार करतील. या योजनेचे ध्येय पुन्हा ह्रदयविकाराचा झटका येण्यास प्रतिबंध करणे आणि ह्रदयविकारामुळे तुमचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता कमी करणे हे असते.
होय. बहुतांश लोकांना दिवसाला निदान ३ ह्रदयाची औषधे घ्यावी लागतात. डॉक्टर तुम्हाला विविध प्रकारची ह्रदयाची औषधे विहित करू शकतात. तुमच्या ह्रदयाची स्थिती आणि तुमच्या हृदयविकाराच्या झटक्यावर कसे उपचार केले गेले त्यानुसार तुमचे उपचार ठरतील. ह्रदयाची काही औषधे छातीत दुखण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात आणि काही ह्रदयाच्या लक्षणांवर उपचार करतात. ह्रदयाची इतर औषधे भविष्यातील हृदयविकाराच्या झटक्यांना प्रतिबंध करण्यास मदत करतात आणि तुमचे आयुष्य वाढवतात. ह्रदयविकाराचा झटका पुन्हा येण्यास प्रतिबंध करण्यासाठी, तुम्हाला कदाचित अॅस्पिरिन घ्यावे लागेल,याला “बीटा ब्लॉकर” म्हणतात, तसेच कोलेस्टेरॉल कमी करणारे औषधही घ्यावे लागेल.
जर तुमचा रक्तदाब जास्त असेल किंवा तुम्हाला मधुमेह असेल (रक्तातील साखर जास्त असणे) तर तुमचे डॉक्टर तुम्हाला त्या स्थितींवर उपचार करणारी औषधे विहित करू शकतात. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल किंवा मधुमेहावर उपचार न केल्यास, तुम्हाला पुन्हा ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच औषधे घेणे महत्त्वाचे असते. तुम्हाला औषधांचे काही दुष्परिणाम जाणवत असतील किंवा काही समस्या असतील तर डॉक्टर किंवा परिचारिकेला सांगा. जर तुम्हाला औषधे परवडत नसतील तर त्याबाबतही तुम्ही डॉक्टरांना सांगावे. या समस्या सोडविण्यासाठी बहुतेकदा मार्ग असतात.
तुमचे डॉक्टर तुम्हाला काही औषधे टाळण्यासही सांगू शकतात, जसे की स्टिरॉईड नसलेली दाहरोधी औषधे (NSAID). NSAID मध्ये नॅप्रोक्सेन (‘अलेव्ह’ हा नमुना ब्रँड आहे) आयबुप्रोफेन (नमुना ब्रँडची नावे ‘मोट्रिन’, ‘अॅडविल’ आहेत) यांचा समावेश होतो.
कदाचित. ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर, तुमचे डॉक्टर किंवा परिचारिका तुमच्याशी याबाबत बोलतील:
आहार सुधारणे: योग्य आहारामुळे तुम्हाला सुदृढ राहण्यास मदत होऊ शकते. फळे, भाज्या आणि भरपूर तंतुमय पदार्थ हृदयविकार आणि स्ट्रोकला (मस्तिष्काघात) प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात. ह्रदय विकार वाढवू शकणारे पदार्थ खाणे टाळा. यांमध्ये अनेक फास्ट फुड पदार्थांत आढळणाऱ्या “ट्रान्स” मेदाम्लांचा समावेश होतो. तुमचे वजन जास्त असल्यास ते कमी करणे महत्त्वाचे आहे. जास्तीचे वजन कमी केल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका पुन्हा येण्याची शक्यता कमी होते.
‘कार्डिअॅक रिहॅब’ किंवा ह्रदयाचे पुनर्वसन ही ह्रदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या व्यक्तींसाठीची विशेष काळजी असते. ह्रदयाच्या पुनर्वसन कार्यक्रमात, डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य व्यावसायिक तुम्हाला तुमचे ह्रदय निरोगी राखण्यास शिकवतात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर पहिल्या २ आठवड्यांत शारीरिक संबंध ठेवणे हे डॉक्टरांनी तुम्हाला शिफारस केलेल्या व्यायामांहून जास्त ताणाचे असू शकते. शारीरिक संबंध ठेवणे पुन्हा सुरू करणे कधी सुरक्षितप आहे ते तुमच्या डॉक्टरांना विचारा. तुमच्या ह्रदयविकाराच्या झटक्याचे आकारमान आणि ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्यावरही तुम्हाला समस्या किंवा काही लक्षणे आहेत का यावर वेळ ठरू शकते.
ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर काही लोकांचा शारीरिक संबंधातील रस कमी होतो किंवा त्याचा तितकासा आनंद मिळत नाही. ह्रदयाच्या काही औषधांमुळे असे होऊ शकते. शारीरिक संबंधांदरम्यान ह्रदयविकाराचा झटका येण्याची काळजी वाटत असल्याने सुद्धा असे होऊ शकते. जर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवण्यात समस्या येत असतील तर तुमच्या डॉक्टर किंवा परिचारिकेला सांगा. ते या समस्यांवर कदाचित उपचार करू शकतील.
पुन्हा वाहन चालवणे आणि कामावर परतणे कधी सुरक्षित आहे याबाबत तुमच्या डॉक्टरांना विचारा. बहुतांश लोकांना ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर १ आठवड्यात वाहन चालवता येते. अनेक लोक ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर २ आठवड्यांनी कामावर परततात.
तुम्हाला ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर तुम्ही छातीत दुखणे किंवा दुसऱ्या ह्रदयविकाराच्या झटक्यांवर लक्ष ठेवावे. ज्या लोकांना एकदा ह्रदयविकाराचा झटका येतो त्यांना दुसरा झटका आणि इतर ह्रदयाच्या समस्या येण्याची शक्यता सामान्य लोकांहून जास्त असते.
ह्रदयविकाराच्या झटक्याचे परिणाम जीवघेणे असू शकतात. तुम्हाला दुसरा ह्रदयविकाराचा झटका येतो आहे असे वाटल्यास, त्वरित रुग्णवाहिकेला कॉल करा. स्वतः रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करू नका.
लक्षणे माहीत असतील आणि जीवनशैलीत बदल केले तर त्यांची नक्कीच मदत होते. आजच कृती करा! तुमचे ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी आमच्या सर्वसमावेशक सुदृढ ह्रदय कार्यक्रमामध्ये नावनोंदणी करा.
The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content
December 3, 2023