1066

Alcohol Realted Liver Disease

Published On February 18, 2025

यकृत का महत्वाचे आहे?

शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव असलेले यकृत हे जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याची अनेक महत्त्वाची कार्य आहेत –

  • पचनाला मदत करणारे पित्त, अर्थात रसायनांचे एक मिश्रण तयार करणे.
  • अन्नाचे पचन करून त्यातून उर्जा निर्माण करणे.
  • रक्तातील धोकादायक घटक काढून संक्रमणाशी लढण्यास मदत करणे.
  • रक्ताची गुठळी होण्यासाठी महत्त्वाची असणारी रसायने तयार करणे.
  • लोह, जीवनसत्वे आणि इतर आवश्यक घटक साठवून ठेवणे.

अल्कोहोलचा यकृतावर कसा परिणाम होतो?

अल्कोहोल हे एक असे विषारी द्रव आहे जे यकृताच्या पेशी खराब करते. कमी प्रमाणात सेवन केलेल्या अल्कोहोलवर यकृत प्रक्रिया करू शकते, परंतु जर अतिप्रमाणात अल्कोहोलचे सेवन केले गेले तर यकृताला मोठी हानी पोहोचते.

अल्कोहोलशी संबंधित यकृताचे इतर कोणते विकार आहेत?

अल्कोहोलशी संबंधित यकृताचे विकार तीन प्रकारचे असतात – फॅटी लिव्हर डिसीज, अल्कोहोलिक हिपिटायटीस आणि अल्कोहोलिक सिरॉसिस

फॅटी लिव्हर डिसीज

खूप जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे यकृतामध्ये जास्तीची चरबी साठवून राहते. अल्कोहोलशी निगडीत आजाराची ही प्रारंभीची स्थिती आहे आणि याची लक्षणे सहसा दिसत नाहीत. चरबी जमा होण्यामुळे यकृत मोठे होते. ज्या रुग्णांचे वजन जास्त आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे त्यांचे यकृत खराब होण्याची जास्त जोखीम असते.

अल्कोहोलिक हेपिटायटीस

अल्कोहोलिक हेपिटायटीसमध्ये यकृताला सूज येते व त्याचा दाह होतो. भूक न लागणे, मळमळणे, उलट्या होणे, पोट दुखणे, ताप येणे आणि कावीळ ही याची लक्षणे आहेत. खूप जास्त मद्यपान करणाऱ्या तीन व्यक्तींपैकी एकाला अल्कोहोलिक हेपिटायटीस होतो. अल्कोहोलिक हेपिटायटीस सौम्य किंवा तीव्र स्वरूपाचा असू शकतो. जर सौम्य स्थिती असेल तर यकृताचे झालेले नुकसान अल्कोहोल सेवन बंद केल्यावर भरून काढता येते. रुग्णाला अल्कोहोलिक हेपिटायटीस झाला असेल आणि तो मद्यपान करत राहिला तर त्यातून लवकरच मोठ्या गुंतागुंती निर्माण होतात, जसे की यकृताचे कार्य बंद पडणे आणि मृत्यू. तीव्र स्वरूपाचा अल्कोहोलिक हेपिटायटीस असलेल्या 50 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.

अल्कोहोलिक सिरॉसिस

अल्कोहोलिक सिरॉसिस म्हणजे यकृताला व्रण पडणे. यकृताच्या मृदू व सुदृढ उती कठीण होतात व त्यांना व्रण पडतात. अल्कोहोलशी निगडीत यकृताच्या आजारांपैकी हा सर्वात गंभीर प्रकार आहे. खूप जास्त मद्यपान करणाऱ्यांपैकी २० ते ३० टक्के लोकांना सिरॉसिस होतो. सिरॉसिसमुळे होणारे नुकसान भरून काढता येत नाही आणि यामुळे सहसा यकृताचे कार्य बंद पडते. सिरॉसिस झालेल्या रुग्णांमध्ये पुढील गुंतागुंती निर्माण होतात –

  • पोटामध्ये (एसाईट्स) आणि पायांमध्ये (एडिमा) द्रवपदार्थ जमा होणे.
  • पोटातील किंवा अन्ननलिकेतील शिरा फुटल्यामुळे रक्ताच्या उलट्या होणे.
  • मानसिक गोंधळ आणि कोमा.
  • मूत्रपिंड निकामी होणे.
  • संक्रमण
  • यकृताचा कर्करोग

अल्कोहोलशी संबंधित आहे यकृताच्या आजारांचे निदान कसे केले जाते?

रुग्णाचा इतिहास, शारीरिक तपासणी, रक्ताच्या चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड स्कॅन करून अल्कोहोलशी संबंधित आहे यकृताच्या आजारांचे निदान केले जाते. फायब्रोस्कॅन हे एक विशेष प्रकारचे अल्ट्रा साउंड आहे, ज्यामध्ये रुग्णाला सिरॉसिस झाला आहे किंवा नाही याचे मूल्यांकन होते. कधी कधी यकृताचे नुकसान तपासण्यासाठी यकृताची बायोप्सी करावी लागू शकते.

अल्कोहोलशी संबंधित आहे यकृताच्या आजारांवर उपचार कसे केले जातात?

अल्कोहोलशी संबंधित यकृताच्या आजारावरील सर्वात महत्त्वाचे उपचार म्हणजे मद्यपान पूर्णपणे बंद करणे. पौष्टिक आहार घेणेही महत्त्वाचे असते. प्रभावित व्यक्तीने नियमितपणे मानसिक समुपदेशन करून घ्यावे आणि मद्यपान सोडण्याच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे. ठराविक प्रकारचे वर्तनातील बदल आणि औषधे यामुळे पुन्हा मद्यपान सुरू होणे टाळण्यास रुग्णाला मदत होऊ शकते. सपोर्ट ग्रुप्सचीही खूप मदत होते.

यकृताला झालेल्या नुकसानामुळे होणाऱ्या गुंतागुंती दूर करण्यासाठी औषधोपचारांची गरज भासू शकते. अल्कोहोलिक सिरॉसिस वाढल्यास, त्यामुळे यकृत निकामी होऊ शकते, यामध्ये केवळ यकृत रोपण केल्यामुळेच जीव वाचवता येतो. ज्या रुग्णांनी मद्यपान पूर्णपणे केले आहे त्यांचा यकृत रोपणासाठी विचार केला जाऊ शकतो.

Could not find what you are looking for? 

Request a Callback

Image
Image
Request A Call Back
Request Type
Image
Doctor
Book Appointment
Book Appt.
View Book Appointment
Image
Hospitals
Find Hospital
Hospitals
View Find Hospital
Image
health-checkup
Book Health Checkup
Health Checkup
View Book Health Checkup
Image
Doctor
Book Appointment
Book Appt.
View Book Appointment
Image
Hospitals
Find Hospital
Hospitals
View Find Hospital
Image
health-checkup
Book Health Checkup
Health Checkup
View Book Health Checkup